breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वारकरी सांप्रदायाला काळिंमा : ‘खूर्ची’च्या वादातून मठाधिपतीचा खून; बंडातात्याही होते ‘टार्गेट’

पंढरपूरातील धक्कादायक घटना, पोलिसांकडून आरोपी जेरबंद

पंढरपूर । महाईन्यूज । ऑनलाईन टीम

 महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाला काळिंमा फासणारी धक्कादायक घटना श्रीक्षेत्र पंढरपूर येथे घडली आहे. मठाधिपती होण्याच्या वादातून कराडकर मठाचे मठाधिपती ह.भ.प. जयवंतबुवा पिसाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे याच मठाचे माजी मठाधिपती ह.भ.प. बाजीराव कराडकर यांनी ही हत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली असून पोलिसांनी कराडकरला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नगर परिसरातील कराडकर महाराजांच्या मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंतबुवा पिसाळ आणि बाजीराव बुवा कराडकर यांच्यामध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद होता. हे दोघे सोमवारी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आले होते. मंगळवारी दुपारी पुन्हा मठाधिपती ‘तू का मी’ यावर वाद सुरू झाला. त्यातून बाजीराव महाराजांनी जयवंत महाराजांच्या अंगावर चाकूने हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केली.

वारकरी सांप्रदायाची शिकवण विसरले…

मठाचा मठाधिपती कोण यातून गेलेला वाद इतका विकोपाला गेला की वारकरी संप्रदायाची शिकवण हे दोघे विसरुन गेले. पोलिसांनी या प्रकरणी बाजीराव कराडकरला अटक केली आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मला बंडातात्यालाही संपवायचे होते : आरोपी कराडकर

ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि ह.भ.प. जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करुन मठाधिपतीपदावर मला खाली खेचले. मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देखील देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या अन जयवंतला संपविण्याचा निर्णय घेतला होता. पण बंडातात्यांनी एक दिवस आधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले, मात्र जयवंत एकटाच सापडला, अशी कबुली बाजीराव कराडकर याने पोलीस चौकशीत दिली.

****

बाजीराव कराडकर म्हणजे पोलिसांनी हद्दपार केलेला ‘वार’करी

पोलिसांनी बाजीरावचे मागील पोलीस रेकॉर्ड तपासले असता बाजीरावने याच कारणावरुन कराडमध्ये एका वारकरी सहकाऱ्याच्या डोक्यात वीणा मारली होती. या कृत्यामुळे बाजीराव तीन महिने जेलची हवा खाऊन आला होता. जेलवारी करुन आल्यानंतर देखील त्याच्या वर्तनात कसलाही बदल झालेला नव्हता मला पुन्हा मठाधिपती करा यासाठी त्याचा सतत अट्टाहास सुरु होता मठाच्या सदस्याकडे जाऊन सतत धमक्या देण्याचे त्याचे सत्र सुरु असल्याने कराड पोलिसांनी बाजीरावला हद्दपार केले होते. या कारवाईमुळे बाजीराव अधिक चिडून होता काटा काढण्यासाठी तो संधीची वाट पहात होता.

पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन संशयित आरोपी बाजीरावला हत्यारासह ताब्यात घेतले. आज न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने बाजीरावला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button