breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वर येथे जाण्यासाठी वाधवान कुटुंबियांना प्रवासासाठी परवानगीचं पत्र देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच जागी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवासी यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गोष्ट शक्य होणार नसल्याचा आरोप करत अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी फडणवीस यांनी केली आहे.

सीबीआय आणि ईडीचा आरोप असलेले वाधवान बंधु यांना महाबळेश्वर येथे जाण्यासाठी प्रवासी पास दणारे विशेष गृहसचिव आमिताभ गुप्ता यांना पुन्हा एकदा त्याच जागी नियुक्त करण्यात आलं आहे. यावर अशा प्रकारचा पास कोणताही अधिकारी आपल्या भरवश्यावर देऊ शकत नाही. जोपर्यंत सराकरमधील किंवा सरकार चालवणारे प्रमुख लोक आशिर्वाद देत नाही किंवा इशारा देत नाही तोपर्यंत ही गोष्ट घडणे शक्य नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. म्हणूनच अमिताभ गुप्ता यांनी क्लिनचिट मिळाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशीची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button