breaking-newsमहाराष्ट्र

वर्ध्यात एकावर चाकूने वार; चव्वाअष्टा खेळण्यातून झाला वाद

महाईन्यूज | वर्धा

चव्वाअष्टा खेळण्याच्या कारणातून झालेल्या वादात इसमावर चाकूने वार केले आहे. ही घटना स्टेशनफैल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. अर्जुन नरपांडे रा. सुदर्शन नगर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. अर्जुन नरपांडे हा त्याचे मित्र सुरज पांडे, सुरज घासले, मेघश्याम भोयर, रवी जामकर यांच्यासोबत निलेश बालमांढरे याच्या घरासमोर चव्वाअष्टा (एक प्रकारचा कवड्या, काचा व लहान दगडाच्या सहाय्याने जमिनीवर चौकोन आखून खेळला जाणारा खेळ) खेळत होता. दरम्यान तेथे छोटू रामटेके हा आला व त्याने मलाही खेळू द्या, असे म्हटले. तेव्हा अर्जुनने सध्या खेळ सुरू आहे तू काही वेळानंतर खेळ असे म्हटले असता रामटेके याने शिवीगाळ केली.

दरम्यान काही काळानंतर विजू नानोटकर आणि अतुल नानोटकर तेथे आले व त्यांनी हातात धारदार शस्त्राने नरपांडेवर वार केले. पार्वती नरपांडे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत तक्रार करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button