वडेट्टीवार पहिल्यांदा भूंकप करतील, त्यानंतर पुनर्वसन करतील – सुधीर मुनगंटीवार
मुंबई |महाईन्यूज|
काँग्रेस नेते विजय वेडेट्टीवार नाराज आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे भूकंप आणि पुनर्वसन खाते आहे. ते पहिल्यांदा भूंकप करतील आणि त्यानंतर पुनर्वसन करतील. असे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यवाणी केली आहे.
राज्याचे कॅबिनेटमंत्री आणि काँग्रेस नेते विजय वेडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विशेष अधिवेशनाला अनुपस्थित राहत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अद्यापही ते नॉट रिचेबल असल्यामुळे राज्यातील राजकारणात नाराजी नाट्याचा अंक कोणते वळण घेणार याची चर्चा जोर धरत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वाद निवळेल असा विश्वास व्यक्त केला असताना भाजप नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी एका वृत्तवाहिनाला प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार राजकीय भूकंप करतील, अशी भविष्यवाणी केली आहे.