Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लॉकडाऊनमुळे नवजात बालकाचा आईच्या पोटातच मृत्यू
अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरीमधे लॉकडाऊन मुळे बंद असलेल्या रस्यावरून गर्भवती महिलेला जाऊ न दिल्याने उपचाराअभावी नवजात बालकाचा आईच्या पोटातच मृत्यू झाला. हि घटना तालुक्यातील आंबी या ठिकाणी झाला.
कोल्हार-बेलापूर रस्ता लॉकडाऊनमुळे बंद असल्याने पोलिसांनी त्या गर्भवतीस दुस-या रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला होता. गर्भवती महिलेने विनंती करूनही पोलिसांनी त्या महिलेला जाण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर दुस-या रस्त्याने गेल्याने उशीर झाल्याने पोटातच नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. व महिलेची प्रकृती चांगली असुन ती सुखरुप आहे.
वेदना सुरू झाल्याने गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात त्या महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र, हॅडग्लोज नसल्याने त्या महिलेला उपचारासाठी दाखल करून घेण्यास आरोग्य सेविकेनेही नकार दिला होता.