Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लॉकडाउन शिथिल होईल असं कुणीही डोक्यात ठेवू नये- आरोग्यमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/rajesh-tope.jpg)
राज्यात आणि देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. २१ दिवसांच्या कालावधीत लोकांना घरातच थांबावं, असं आवाहनही सरकारकडून वारंवार करण्यात आलं. २१ दिवसांचा लॉकडाउनला अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत.
मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे शिथिल होईल, असं कुणीही गृहित धरू नये,” असं टोपे यांनी सांगितलं आहे.