breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
लता मंगेशकर रुग्णालयात; ICU मध्ये दाखल
![Empress Lata Mangeshkar coronated; Information of Health Minister Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/lata-mangeshkar-.jpg)
मुंबई:- जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना मुंबईत रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त आहे. लतादीदींना श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स अजून हाती आलेले नाहीत. लता मंगेशकर ICU मध्ये आहेत, असं समजतं. रुग्णालयाने त्यांच्याबद्दल अजून कोणतीही माहिती अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही.
लता मंगेशकर 90 वर्षांच्या आहेत. पहाटेच त्यांना रुग्णालयात नेल्याचं समजतं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर नाही. स्थिर आहे. तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.