Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
लग्न ठरत नसल्याने तरूणाची आत्महत्या
![Former BJP minister commits suicide by strangulation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/sucide_2017082133-1.jpg)
सातारा- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बदेवाडीतील एका 28 वर्षीय लग्न ठरत नसल्याने आत्महत्या केली आहे. नितीन शेंडगे (वय 28, वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, नितीन शेंडगे हा मागील काही महिन्यांपासून लग्नासाठी मुली पाहत होता. मात्र, त्याचे लग्न जुळत नव्हते. मात्र, त्याच्या बरोबरीच्या मित्रमंडळींची लग्न झाल्याने तो नैराश्यात गेला होता. गुरूवारी रात्रीही त्याच्या घरात त्याच्या लग्नावरून चर्चा झाली होती. त्यानंतर तो झोपायला गेला. रात्री उशिरा त्याने घरातील तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही बाब उजेडात आली. या घटनेची भुईंज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.