breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रोहित पवार कडून पंकजा मुंडे यांचे कौतुक
![It is inappropriate to use an organization like ED in a political manner - Rohit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/rohit-pawar-1.jpg)
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सतत दौऱ्यांवर आहेत. तसेच त्यांच्या अनेक बैठकाही घेणे सुरूच आहे. दरम्यान यावरुन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांना सॅल्यूट केला आहे. यानंतर आमदार रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचे तोंडभरुन कौतुक केले आहे. यानंतर रोहित पवारांनी पंकजा मुंडेंना रिट्विट करत त्यांचे कौतुक करत आभार मानले आहे.
रोहित पवार म्हणाले की, ‘धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा.’