breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रोख रक्कम, दारू, दागिन्यांसह 75.79 कोटी रुपयांचा ऐवज जप्त

निवडणूक आयोगाची कारवाई 
राज्यात सि-व्हिजील ऍपवर 1 हजार 862 तक्रारी दाखल

मुुंबई – लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांना निवडणूक आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पोलीस, अबकारी व आयकर विभागाने केलेल्या कारवाईत राज्यभरातून रोख रक्कम, दारू, अमली पदार्थ, सोने-चांदीचे दागिने मिळून तब्बल 75.79 कोटी रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात तक्रार करण्यासाठी आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सि-व्हिजील मोबाईल ऍपवर आतापर्यंत 1 हजार 862 तक्रारी नागरीकांनी केल्या आहेत.

निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी रोख रक्कम, दारू, पार्ट्या आदी गोष्टींचे आमिष दाखवले जाते. परंतु निवडणूकीदरम्यान अशा जेवणाळ्या व पार्ट्यांबरोबरच रोख रकमाच्या वाटपाला आळा घालण्यासाठी आयोगाने विविध पथके तैनात केली आहेत. त्यानुसार मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता यावे यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने पोलीस, आयकर, अबकारी विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 19.82 कोटी रुपये रोख रक्कम, 38.36 कोटी रुपये इतक्‍या किमतीचे सोने व इतर जवाहिर, 13.64 कोटी रुपये इतक्‍या किमतीची दारु, 3.96 कोटी रुपये इतक्‍या किमतीचे मादक पदार्थ याप्रमाणे एकूण 75.79 कोटी रुपये इतक्‍या रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांनी दिली.

निवडणुकीचे काम आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि संबंधित कायदा व नियमांनुसार पार पाडण्यात येत आहे, हे पाहण्याकरिता आयोगाकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाकरिता विविध निरीक्षक नेमण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सि-व्हिजील ऍपवर आतापर्यंत 1 हजार 862 तक्रारी नागरिकांकडून तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींवर जिल्हास्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मोहोड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button