breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे ट्रॅकच्या बाजूला फेकून दिलेल्या मुलींच धनंजय मुंडे यांनी स्विकारलं पालकत्व…

बीड | महाईन्यूज|

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री यांनी आदर्श काम केलं आहे. परळीमध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूला झाडाझुडपात फेकून दिलेल्या बाळाचं पालकत्व धनंजय मुंडे यांनी स्वीकारलं आहे. या बाळाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. या मुलीचं पालकत्व स्वीकारल्याने धनंजय मुंडे यांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

परळीमध्ये काल म्हणजे 24 फेब्रुवारी संध्याकाळी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक बाभळीच्या काट्याच्या झुडपामध्ये कुणी तरी फेकून दिले होते. बाळाचं दैव बलवत्तर होता म्हणूनच रेल्वे रुळाच्या बाजूने जाणाऱ्यांची नजर बाळावर गेली. त्यानंतर त्यांनी बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. याची माहिती बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यांनी फोनवरुन वैद्यकीय अधिकाऱ्यांना लवकरात लवकर उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

परळीच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये या नवजात बाळावर उपचार सुरु झाले. धनंजय मुंडे यांनी याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही दिली. या मुलीच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी उचलली आहे. खरंतर जन्मत:च तिच्या आयुष्याचा प्रवास काटेरी झुडपातून झाला आहे. त्या चिमुकलीचं नामकरण सुद्धा धनंजय मुंडे यांनी ‘शिवकन्या’ असं केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button