रेल्वेसमोर तरूणाची आत्महत्या…
![माऊंट त्रिशूल मोहिमेतील चार नौदल कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/death-Frame-copy-3.jpg)
जळगाव | महाईन्यूज
रिंगणगाव (ता़ एरंडोल) येथील गजानन सुकलाल महाजन (३५) या तरूणाने गितांजली एक्सप्रेस समोर स्वत: ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर घडली़ याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ त्याच्या आत्महत्येचे कारण समजून आलेले नाहीये.
गजानन महाजन हा आई-वडील पत्नी व मुलासह रिंगणगाव येथे वास्तव्यास होता़ बांभोरी गावाजळील खुबचंद सागरमल पेट्रोल पंपाजवळ पंक्चरचे दुकान लावून घराचा उदरनिर्वाह करीत होता़ शुक्रवारी सकाळी दुकानावरील सहकार्याला मी चारचाकीचा लिलाव आहे तेथे जावून येतो, तोपर्यंत दुकान उघड असे सांगितले होते. त्यानंतर गजानन हा दुकानावर आला नाही़ त्यातच बजरंग बोगद्यावरील शिरसोलीकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावरील खांबा क्रमांक ४१८/१ जवळ धावत्या गितांजली एक्सप्रेस समोर त्याने स्वत:ला झाकून देत आत्महत्या केली आहे.