रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1localtrain_16.jpg)
विविध कामांनिमित्त पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्गावर आज १० मार्च रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण ते दिवा अप जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
कुठे: कल्याण ते दिवा अप जलद मार्ग
कधी: रविवार, १० मार्च स. ११.१५ ते दु. ३.४५ वा.
परिणाम : सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल कल्याण ते ठाणेदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जाणार
आहेत.
हार्बर मार्ग
कुठे: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर
कधी: रविवार, १० मार्च. डाऊन मार्ग: स. ११.४० ते दु. ४.१० वा. आणि अप मार्ग – ११.१० ते दु. ३.४० वा.
परिणाम: सीएसएमटी ते वाशी, बेलापूर दरम्यान लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप व डाऊन धिमा मार्ग
कधी- रविवार, १० मार्च स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.
परिणाम- चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान दोन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.