Breaking-newsमहाराष्ट्र
राज्यात 8,232 पोलिसांना लागण,राज्यात 8,232 पोलिसांना लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/police-and-corona-2-2.jpg)
लॉकडाऊनच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सदैव तत्पर राहिलेल्या महाराष्ट्र पोलिस दलात कोरोनाच्या शिरकावाची चिंता कायम आहे. राज्यात आतापर्यंत 8,232 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून 93 जणांना महामारीशी लढताना प्राण गमवावा लागला आहे. यात सात वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे. तसेच 6,314 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्य प्रशासनातील अधिकार्यांनी शनिवारी दिली.
मुंबई पोलिसांची होणार रॅपिड अँटीजेन चाचणी
मुंबई पोलीस दलातल्या 45 ते 55 कयोगटातील पोलिसांची आता रॅपिड अँटीजेन डिटेक्शन चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 93 पोलीस ठाण्यात ही चाचणी करण्यात येणार आहे.