Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात 24 तासांत ५ हजार ९८४ नवे कोरोना रुग्ण;१५ हजार ६९ रुग्ण मागील २४ तासांमध्ये बरे
![# Covid-19: Worrying! Even after vaccination, many suffer from coronary heart disease](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive-2.jpg)
मुंबई – महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत ५ हजार ९८४ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर १५ हजार ६९ रुग्ण मागील २४ तासांमध्ये बरे झाले आहेत.
राज्यात आत्तापर्यंत एकूण १३ लाख ८४ हजार ८७९ कोरोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ८६.४८ टक्के एवढे झाले आहेत. राज्यात मागील २४ तासांमध्ये १२५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८१ लाख ८५ हजार ७७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २४ लाख १४ हजार ५७७ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर २३ हजार २८५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.