Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात 24 तासांत १८८ पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या भयाण परिस्थितीमध्ये सर्वांचे रक्षण करणारे पोलीस हे सुद्धा कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात सध्या २३ हजार ५४८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या २४७ वर पोहचली आहे. एकूण २० हजार ३४५ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. अशातच काल एका दिवसात पुन्हा १८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.