राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर
![# Covid-19: Double mutation in more than five hundred specimens in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow-1.jpg)
मुंबई | राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात 23 हजार 644 रुग्ण रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 10 लाख 16 हजार 450रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढलं आहे. राज्यात पहिला रुग्ण 9 मार्चला आढळला. त्यानंतर 25 मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांवर पोहोचले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यातही कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाखांवर पोहोचली.