breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात रविवारी 6,555 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद…

राज्यात रविवारी ६,५५५ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे… तर ३,६५८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दिवसभरात १५१ मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६ हजार ६१९ वर गेली असून त्यापैकी १ लाख ११ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत.

पुणे विभागात वीस हजार कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे झाल्याचं समोर आलं आहे…तर, ३३ हजार ८५७ बाधितांची नाेंद करण्यात आली आहे.पुणे विभागात वीस हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ८५७ इतकी आहे. ॲक्टिव्ह रुग्ण १२ हजार २९१ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण एक हजार २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारअखेर ६१७ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. मृत्यूचे प्रमाण ३.६२ टक्के तर बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६०.०८ टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी रविवारी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button