breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात गेल्या 24 तासात 112 पोलीसांना कोरोनाची लागण
मुंबई – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात रोजच कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. राज्यात गेल्या 24 तासात 112 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्नं झालं आहे. तर दोन पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 12,495 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून; 10,111 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात करून ते आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहे.
तर सध्या राज्यातील विविध जिल्ह्यात 2,256 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. तर 128 पोलीसांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यु झाला आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्मचारी रात्रं-दिवसं आपल्या कर्तव्यावर होते. त्या दरम्यान बहुतांश पोलीसांना कोरोनाची लागण झाली होती.