breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाखांच्याही खाली

  • मुंबईत १८२३, पुण्यात ९६४ नवे रुग्ण

मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी ११ हजार ४४७ नव्या रुग्णांनी वाढ झाली आहे. तर, गेल्या २४ तासांत १३ हजार ८८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३०६ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.

नव्या रुग्ण संख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा १५ लाख ७६ हजार ०६२ वर पोहोचला असून यामध्ये १३ लाख ४४ हजार ३६८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर, ४१ हजार ५०२ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यामुळे सध्या राज्यात १ ८९ हजार ७१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३०६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या ७९ लाख ८९ हजार ६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ७६ हजार ६२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या २३ लाख ३३ हजार ५२२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २३ हजार ४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला १ लाख ८९ हजार ७१५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ३०६ मृत्यूंपैकी १११ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १२५ मृत्यू एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचे आहेत. अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button