breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन! पूर्णपणे शुकशुकाट

राज्यात काेरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबादेत शुक्रवारपासून ८ दिवसांच्या लॉकडाऊनचा प्रारंभ झाला. प्रशासनाने बहुतांश दुकाने आणि सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याची घोषणा केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.

सोलापूर | शहरात लॉकडाऊन होणार आहे. शनिवारी दुपारी अंतिम निर्णय होईल. लोकांना ५ दिवस अगोदर कळवले जाईल.

नांदेड | जिल्ह्यात १२ जुलैपासून आठवडाभर लॉकडाऊन असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील.

कल्याण-डोंबिवली | येथील लाॅकडाऊनही १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

ठाणे | १९ जुलैपर्यंत संचारबंदी

ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहता लाॅकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड | १० दिवस लॉक

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. येथे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १० दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button