राज्यातील खासगी डॉक्टरांना 50 लाखांचे विमा संरक्षण-आरोग्यमंत्री राजेश टोपे
![Health department exams will be held, possible dates announced by Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/images_1585299288869_rajesh_tope.jpg)
सांगली – कोरोना स्थितीत राज्यातील खाजगी डॉक्टरांनासुद्धा आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. जर एखादा डॉक्टर आरोग्य सेवा बाजवताना कोरोना बाधित होऊन मृत्यू झाल्यास त्या डॉक्टरांना 50 लाख रुपये विमा मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर्सनी आता त्यांच्या सुरक्षेची काळजी करण्याचं कोणतेच कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
सांगली जिह्यातील इस्लामपूर येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले, राज्यातल्या सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना काळात विमा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा यावेळी केली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात जर एखादी हिंसक घटना डॉक्टरांसोबत घडल्यास कारवाई करण्याच्या सूचना गृह खात्यामार्फत देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
– राज्यात आरोग्य विभागात 17 हजार जागा भरल्या जातील अशी घोषणाही करत मास्क आणि सॅनिटायझर याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करण्यात येणार आहे.
– कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्या तरी फैलाव वाढत आहे. काहीजणांसाठी संसर्ग जीवघेणा ठरत आहे. गेल्या 24 तासांची आकडेवारीनुसार देशात दर मिनिटामागे दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.