breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,22,048 वर

  • मुंबईत 557, पुण्यात 327 नवे रुग्ण

मुंबई – सोमवारी दिवसभरात आढळलेल्या 2,498 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19,22,048 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,501 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 50 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 18,14,449 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 49,305 वर पोहोचला आहे. तर सध्या 57,159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-भारतात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 557 नवे रुग्ण आढळले, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,91,471 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,088 इतका झाला आहे. तसेच शहरात सध्या 8,187 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,02,24,303 वर

त्याचबरोबर सुरुवातीला दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 327 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,70,962 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 7,726 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 3,48,970 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 14,231 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button