breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18,83,365 वर

  • मुंबईत 477, पुण्यात 475 नवे रुग्ण

मुंबई – सोमवारी दिवसभरात आढळलेल्या 2,949 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18,83,365 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 4,610 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 60 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 17,61,615 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 48,269 वर पोहोचला आहे. तर सध्या 72,383 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा :-देशात 24 तासांत 22,065 नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत सोमवारी कोरोनाचे 477 नवे रुग्ण आढळले, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,87,303 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,988 इतका झाला आहे. तसेच काल 533 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने मुंबईत आतापर्यंत 2,66,695 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 9,008 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 475 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,53,707 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,631 इतका झाला आहे. तसेच काल 726 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,35,154 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 475 रुग्णांमध्ये 196 रुग्ण हे पुणे शहरातील असून 95 रुग्ण पिंपरी-चिंचवड आणि 156 रुग्ण ग्रामीण भागातील व 28 रुग्ण कंटेनमेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button