breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17,47,242 वर

  • मुंबईत 577, पुण्यात 329 नवे रुग्ण

मुंबई – रविवारी दिवसभरात आढळलेल्या 2,544 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 17,47,242 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 3,065 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 60 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16,15,379 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 45,974 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 84,918 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत रविवारी कोरोनाचे 577 नवे रुग्ण आढळले, तर 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,69,704 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,570 इतका झाला आहे. तर सध्या मुंबईत 9,956 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 329 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,31,418 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 8,170 इतका झाला आहे. तसेच काल दिवसभरात 353 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,14,072 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 329 रुग्णांपैकी 153 रुग्ण हे पुणे शहरातील आणि 91 रुग्ण हे पिंपरी-चिंचवड येथील आहेत, तर 59 रुग्ण पुणे ग्रामीण भागातील आणि 7 रुग्ण कंटेन्मेंट झोनमधील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button