breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात

राज्यातील काही भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. त्याची संख्या कमी आहे . परंतू, येत्या काही काळात राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ‘ राज्यातील नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता भासल्यास कोरोना व्हायरसची चाचणी करुन घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे’, असे अवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुणे शहरातील लॉकडाऊन हळूहळू हटविण्यात येत आहे. पुणे शहरातील लॉकडाऊन हटविण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मत वेगळे होते. पुण्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने हटवावा असे मुख्यमंत्र्यांचे मत होते. मात्र, पुण्यातील व्यावसायिक, व्यापारी वर्ग, विविध नेते, संघटना यांची मागणी होती. अशा वेळी सर्वांचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन हटविण्याचा विचार करण्यात आला, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यातील आणि राज्यातील अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. मास्क न वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नागरिकांनी मास्क वापरण्याची आणि मास्क वापरण्याची सवय लाऊन घेण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button