Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटीव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/परिवहन-मंत्री-अनिल-परब.jpg)
मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका नेत्याला कोरोनाची लागण जाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, हसन मुश्रीफ, बच्चू कडू, नितीन राऊत, एकनाथ शिंदे यां मंत्र्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तसेच, काल (११ ऑक्टोबर) मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी शिवसेनेच्या विभागप्रमुखांची बैठक पार पडली होती.