breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राज्यव्यापी आंदोलनानंतर परिवहन खाते रिक्षा चालकांच्या समोर नरमले

  • मुंबईतील बांद्रा येथे झाली राज्यव्यापी बैठख
  • चालक-मालकांच्या मागण्या मान्य करण्याचे दिले आश्वासन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रिक्षा चालक-मालकांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटना प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी (दि. 30) मुंबईतील बांद्रा येथील परिवहन आयुक्त कार्यलयात पार पडली. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी रिक्षा संघटना प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे प्रश्न समजून घेतले. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.

नविन परवाना बंद करणे, रिक्षा चालक-मालकांसाठी परिवहन विभागअंतर्गत कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणे, इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करणे, पासिंग ट्रॅकचा प्रश्न सोडवणे, ओला उबरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करणे, बजाज कंपनी आणि त्यांच्या डीलरवर कारवाई करणे, यासह अनेक प्रश्नावर बैठकीत मांण्यात आले. त्यावर सखोल चर्चा करून हे प्रश्न कोणत्याही हालातीत मार्गी लावण्याचे आश्वासन परिवहन आयुक्त चन्ने यांनी दिले आहे, असे बाबा कांबळे यांनी कळविले आहे.

बैठकीत ऑटो रिक्षा संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, उपाध्यक्ष गफर नदाफ,  मारुती कोंडे, प्रमोद घोणे, सहसचिव मच्छिंद्र कांबळे, महेश चौगुले, प्रदेश सदस्य आनंद तांबे, फिरोज मुल्ला, सुरेश गलांडे, भारत नाईक, सुनिल बोर्डे, राजेश बुटले, महादेव विभूते, स्वामी बल्लूर, सुनील पाटील, आनंद चौरे, लखन लोंढे, तुषार मोहिते, आरिफ शेख, इम्रान सय्यद, बालन मुजावर, अशोक इंगळे, जावेद पटवेगर, मोहसीन पठाण, संजय चव्हाण, युनूस तांबोळी, सुखदेव कोळी, उदय कोळी आदी  पदाधिकारी उपस्थित होते .

२७ नोव्हेंबर २०१८ रोजी महाराष्ट्रातील सर्व आर टि ओ कार्यलायवर रिक्षा संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनाची दखल घेऊन परिवहन आयुक्तांनी हि बैठक बोलावली होती. बैठक आयोजित केल्याबद्दल बाबा कांबळे यांच्या हस्ते  कृती समितीच्या वतीने शेखर चन्ने यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

आंदोलनाची दखल घेऊन सरकारने आमच्याशी चर्चा केली. बैठकीत ठरल्याप्रमाणे निर्णय न झाल्यास जानेवारीत तिव्र आंदोलन करण्यात येईल.

शशांक राव, अध्यक्ष

बजाजच्या डीलर्सनी RTO पासिंगच्या नावाखाली केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची माहिती पुराव्यासाहित सादर केली. गेले 15 महिन्यांपासून तक्रार केली. तरीही, कारवाई न केल्याचे निदर्शनास आणून दिले.

आनंद तांबे, प्रदेश सदस्य

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button