Breaking-newsमहाराष्ट्र
राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ !- धनंजय मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/karunanidhi-1.jpg)
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एम. करुणानिधी यांच्या निधनानं भारतीय राजकारणातलं एक संघर्षशील, अष्टपैलू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अपराजित राहिलेले करुणानिधी हे खऱ्या अर्थानं ‘द्रविड योद्धा’ होते. अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.
माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पार्थीव शरीराला अंत्यदर्शनासाठी चेन्नईच्या राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एमके स्टालिन आणि कानोमोझी यांच्याशी चर्चा केली.
रजनीकांत, रितेश देशमुख आणि अन्य काही कलाकार मंडळींनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट केला आहे. काही तासांपूर्वी रजनीकांत आणि त्यांचा जावई धनुष हे राजाजी हॉल येथे अंत्यदर्शनाला आले होते.