रस्त्यावर सभा घेण्याची परवानगी द्या, मनसेची निवडणूक आयोगाकडे मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/4574.jpg)
पुणे | महाईन्यूज
काल पाऊस झाल्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द करावी लागली. परतीच्या पावसामुळे मैदानांवर मातीचा चिखल होत आहे. परिणामी, सभा घेण्यास व्यत्यय येत आहे. त्यामुळे रस्त्यावर सभा घेण्याची मुबा द्यावी, अशी मागणी मनसेने निवडणूक आयोगाला केली आहे.
मनसेची पहिली सभा पुण्यातील एका शाळेच्या मैदानावर होणार होती. मात्र, सभेच्या वेळेआधीच पुण्यात जोरदार पाऊस झाला. या मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. नाईलाजाने राज ठाकरेंना ही सभा रद्द करावी लागली. त्यानंतर आज मुंबईत सायंकाळी सहा वाजता सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये पहिली सभा आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभांवरही पावसाचे सावट असल्याने मनसे कार्यकर्ते आणि खुद्द राज ठाकरे चिंतेत आहेत.
या आस्मानी संकटासमोर हतबल झालेल्या राज ठाकरे यांना अखेर निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागले. मैदानात सभा घेण्याऐवजी रस्त्यांवर सभा घेण्यासाठी परवानगी मागावी लागली. मनसेच्या या पत्रावर अद्याप निवडणूक आयोगाकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही.