रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी कोरोनावर मात करून पुन्हा सेवेत
रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ते शनिवारपासून पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले असून यातून त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेचे दर्शन होते
कोरोना साथ रत्नागिरीत आल्यापासून विविध उपाययोजना करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. प्रवीण मुंढे हे रस्त्यावर उतरून काम करताना दिसत होते. कोरोनाचा धोका पत्करून वादळग्रस्त व लॉकडाऊन मध्ये छोट्या व्यवसायिकांना मदत करण्यासाठी त्यांनी रत्नागिरी आर्मी सारखी मोठी यंत्रणा उभारून प्रभावी काम केले. आपले कर्तव्य बजावत असताना हजारो लोकांशी येणारा संपर्क टाळणे त्यांच्यासाठी केवळ अशक्य होते. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली व त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण नेहमीप्रमाणे ही लढाई देखील त्यांनी जिंकली असून कोरोनावर मात करून ते आज पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.