युती बाबत आमचं ठरलं आहे इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये – उद्धव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/udhav-t.jpg)
महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल असे वक्तव्य काही भाजपा नेते करत आहेत. त्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युती बाबत ठरले आहे. इतर कोणी त्यात आता तोंड घालू नये अशी प्रतिक्रीया दिली आहे. पत्रकारांनी गिरीश महाजन यांच्या मुख्यमंत्री भाजपचाच होणार या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असताना ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. ज्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे मुख्यमंत्री कोण होणार या विषयापेक्षा अधिक महत्वाचे आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला का? उज्वला गॅस योजनेचा लाभ किती गरीबांना मिळाला? गॅस घरोघरी खरोखरच पोहोचले आहेत का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला का? शेतकरी कर्जमुक्त झाला का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.
शिवसेना सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सरकारमधे आहे. शेतकऱ्यांनी आपली दुःख बाजूला ठेऊन आपल्याला लोकसभा निवडणुकीत निवडून दिले आहे. आता त्यांची दुःख दूर करणे हे आपले कर्तव्य आहे असेही ते म्हणाले.