Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
यंदा मान्सून 30 मे रोजी केरळात दाखल होणार!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/mansun.jpg)
मुंबई : यंदाच्या वर्षी मान्सून 30मे रोजी मान्सून केरळात दाखल हाणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
गेल्या आठवडय़ात हवामान खात्याने यंदा जास्त पावसाची शक्यता वर्तवली होती. दरवर्षी मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होतो मात्र यंदा दोन दिवसाआधी म्हणजे 30मे रोजी केरळात दाखल होणार आहे. यंदा हवामान विभागाने 15 रोजी मानसून अंदमान -निकोबार द्वीपसमूहामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण त्याएकदिवस आधीच 14 मे रोजी अंदमानात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मान्सून केरळात पोहाचल्यानंतर पुढील सात दिवसात महाराष्ट्रात पाहोचेल असा अंदाज आहे.