breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यंदा कार्तिकी एकादशीनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही

पुणे – देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात आलेला नाही. अशातच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती आरोग्य संस्थांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या कार्तिकी यात्रेनिमित्त निघणाऱ्या दिंड्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. आषाढीनंतर भरणारी ही मोठी वारी आहे. या यात्रेत गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहे. त्यामुळे एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत. याबाबत पोलीस, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आवश्‍यक खबरदारी घ्यावी, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. तसेच त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button