breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

…म्हणून सारा तेंडुलकरने केले नाही मतदान

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभेसाठी सोमवारी मतदान पार पडले. महाराष्ट्रात सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाले तर हरियाणामध्ये ६५ टक्के मतदान झाले. काल राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. मात्र असे असतानाच अनेक सेलिब्रिटीजने घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसहीत मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्याने मतदान करण्याचे आवाहनही केले.

दुपारी बाराच्या सुमारास सचिनने वांद्र्यामध्ये मतदान केले. यासंदर्भात त्याने नंतर फेसबुकवर फोटोही पोस्ट केला होता. पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनबरोबरच्या फोटोत सचिन बोटाला लावलेली मतदानाची शाई दाखवता दिसत आहे. “मतदान करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. माझं मत मी नोंदवलं आहे, आपण सर्व सुद्धा मतदान करून या लोकशाहीच्या सोहळ्याचा भाग व्हा,” असा संदेश या फोटोबरोबर सचिनने पोस्ट केला होता.

मात्र सचिनची मुलगी सारा तेंडुलकर मतदानाला आली नाही. सारा कुठे आहे असा सवाल अनेकांनी सोशल नेटवर्किंगवर विचारला. सारा परदेशात असल्याने ती मतदानाला येऊ शकली नाही.

१२ ऑक्टोबर १९९७ रोजी जन्म झालेली सारा ही नुकतीच २२ वर्षांची झाली आहे. ती सध्या लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळेच तिला मतदानासाठी मुंबईमध्ये येता आले नाही. म्हणूनच संपूर्ण तेंडुलकर कुटुंबिय मतदानाला गेले असता सारा अनुपस्थित होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button