मोदींसमोर मंत्र्याचा महिला मंत्र्याला नको तिथे स्पर्श
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Tripura-BJP-minister-Monoj-Kanti-Deb-caught-on-camera-1.jpg)
आगरताळा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी त्रिपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान त्रिपारातील राज्यमंत्री मोनोज कांती देव यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एका महिला मंत्र्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधकांवर चारित्रहननाचा आरोप केला आहे.
विरोधी पक्षाचे संयोजक बिजन धर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ज्या मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री विप्लब कुमार देव आणि अन्य नेते जाहीर सभेला संबोधित करत होते. त्यावेळी एका महिला मंत्र्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला. मोनोज कांती देव यांनी हे कृत्य केलं. त्यांनी समाज कल्याण आणि शिक्षणमंत्री संतना चकमा यांच्या कमरेवर हात ठेवला. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करुन, त्यांना अटक करायला हवं”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर सार्वजनिक झाला आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त दिलं आहे, मात्र या व्हिडीओची पुष्टी होऊ शकलेली नाही. शिक्षणमंत्री संतना चकमा या आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्व करतात. मोनोज कांती देव यांनी मंत्रिमंडळातील एकमेव महिलेचं चारित्र्य आणि पावित्र्यावर घाला घातला, असा आरोप विरोधी पक्षाने केला.