Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
मेट्रो-3 च्या रात्रीच्या कामावरील स्थगिती तुर्त कायम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/3Metro_71.jpg)
- 2 ऑगस्टला फैसला
मुंबई – अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मेट्रो-3च्या प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईतील कफ परेड भागात रात्रीच्यावेळी कामावरील स्थगिती उच्च न्यायालयाने तुर्त कायम ठेवली आहे. मेट्रो प्रकल्प हा लोकहिताचा असला तरी महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या अहवालानंतर रात्रीच्या कामाला परवानगी देण्यासंबंधी फैसला दिला जाईल, असा निर्णय न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने देत याचिकेची पुढील सुनावणी 2 ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.
ध्वनी प्रदुषणाच्या मुद्यावरुन डिसेंबर 2017 पासुन रात्रीच्यावेळी मेट्रोच्या कामावर न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी आणि 24 तास काम करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज मेट्रो प्रशासनाने उच्च न्यायालयात केला आहे. तर दक्षिण मुंबईतील स्थानिक नागरीक रॉबीन जयसिंघानी यांनी आक्षेप घेतला आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.