breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलीच होतात म्हणून बीडच्या डॉक्टरकडून मुलीसह पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

बीड – वंशाचा कुलदीपक हा मुलगाच असतो मुलगी नाही ही मानसिकता समाजात आजही खोलवर रुजलेली आहे. सर्वसामान्य माणसांचे सोडा, बीड जिल्ह्यातील केज मधील एक डॉक्टरही वंशाच्या दिव्यासाठी पछाडला होता. सतत मुलीच होतात म्हणून त्यांनी आपल्या चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरची पत्नी ही पोलीसाची मुलगी आहे. या घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
दैव बलवत्तर म्हणून ही पत्नी वाचली आहे. या डॉक्टर पतीने चार महिन्यांच्या मुलीला आणि पत्नीला त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र काडेपेटी भिजल्यामुळे दुसरी शोधेपर्यंत डॉक्टरला वेळ लागला. त्याच वेळात पत्नीने रॉकेलने भिजलेल्या अवस्थेत पळ काढला आणि जीव वाचवला. मात्र तिची चार महिन्यांची मुलगी घरीच राहिली. ही घटना केज तालुक्यातील कळंब गावातील आहे. डॉक्टर विशाल प्रल्हाद घुगे याने हे अत्यंत नीच कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉक्टर विशाल घुगे याचा केज तालुक्यातील सारोळा गावातील प्रियंका ढाकणे हिच्याशी विवाह झाला होता. पहिल्यांदा प्रियंका हिला मुलगी झाल्याने सासरच्या लोकांकडून प्रचंड त्रास झाला होता. नंतर प्रियंका दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. आता तरी मुलगा होईल या अपेक्षेने सासरच्यांचा त्रास थोडा कमी झाला. मात्र पाच महिन्यांपूर्वी प्रियाकाला पुन्हा एकदा मुलगीच झाली. त्यामुळे पती आणि सासरच्या मंडळीकडून प्रियांकाचा छळ सुरू झाला होता. तुला मुलगा का होत नाही? म्हणून सतत मारहाण आणि शिवीगाळ करण्यात येत होती. प्रियंकाला पोटभर जेवणही दिले जात नव्हते.
शुक्रवारी रात्री प्रियंका हिला तिच्या पतीने आणि सासरच्या माणसांनी शिवीगाळ केली. प्रियांकाने जाब विचारल्यानंतर डॉक्टर पती आणि प्रियंका मध्ये भांडण झाले. या भांडणाच्या वेळी डॉक्टर पतीने तिला मारहाण करीत तिच्यावर चार महिन्याच्या लहान मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत प्रियांकाने मुलीला घेऊन पळ काढला. मात्र मुलगी तिथेच राहिली. आता या मुलीला वाचवा म्हणून प्रियांका आक्रोश करीत आहे. डॉक्टर पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button