मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा !
![PM Narendra Modi wishes newly wed couple from Indapur district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/narendra-modi-4.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून शुभेच्छा. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी ते मेहनतीने काम करतील, हा मला विश्वास आहे” असे मोदी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
काल रात्री सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवरुन चर्चा झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडीकडून पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळयाचे निमंत्रण देण्यात आले होते. शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळयाला भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी पत्नीसह शपथविधी सोहळयाला उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महिन्याभराने महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले. त्याआधी राज्याच्या राजकारणात प्रचंड सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडखोरी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण, अवघ्या तीन दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार कोसळले.