मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्याबाबत निवडणूक आयोगाची CBDT कडे विनंती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/CM-Uddhav-Thackeray-1-1024x569-1.jpg)
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार एका अधिकार (RTI) कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) यांना प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे. एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलेले आहे.
प्राप्त माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीची सत्यता तपासावी अशी विनंती आयोगाने CBDT कडे केलेली आहे. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे एक महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार दिलेली होती.
या तक्रारीबाबत निवडणूक आयोगाला स्मरणपत्रही मिळालेले होते. त्यानुसार दखल घेत निवडणूक आयोगाने CBDTकडे विचारणा केलेली आहे. निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे केलेल्या विचारणेमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता आणि कर्जाची पडताळणी करण्याबाबत सांगण्यात आल्याचे समजते. निवडणूक आयोगाने जून 2020 च्या 16 तारखेला भूमिका जाहीर करत म्हटले होते की, लोकप्रतिनिधींच्या खोट्या प्रमाणपत्रांबाबत जर तक्रारी आल्या तर निवडणूक आयोग त्याची गंभीर दखल घेईल.