breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबई विद्यापीठाची फोर्ट इमारत व परिसराच्या हेरिटेज सौंदर्यवृद्धीसाठी २०० कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धींगत करण्यासाठी २०० कोटींचा निधी चार वर्षात टप्प्याटप्याने उपलब्ध करून देण्याचा निर्णय  उपमुख्ममंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केला.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांचा ऐतिहासिक आणि गौरवशाली वारसा आहे. विद्यापीठाच्या इमारतीचं सौंदर्य व परिसराला जागतिक वारशाचं महत्व लक्षात घेता आणि मुंबई शहर आणि शहरातील इमारतीचं सौंदर्य खुलवण्याच्या दृष्टीनं विद्यापीठ इमारत व परिसराला मूळ सौंदर्य बहाल करुन देणार आहे शिवाय शिकणाऱ्या व भेट देणाऱ्या नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे मुंबई विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलणार आहेच शिवाय यानिर्णयातंर्गत यावर्षी पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठ आणि एमएमआरडीए यांच्या समन्वयातून यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची अंमलबजावणी होणार आहे. फोर्ट कॅम्पसप्रमाणे विद्यापीठाच्या कालिना येथील इमारतींची सौंदर्यवृद्धी, परिसराची स्वच्छता, वृक्षलागवड, अतिक्रमण निर्मूलन, शैक्षणिक सुविधांचा विकास आदींबाबतही बैठकीत चर्चा झाली. कालिना तसेच राज्यातील विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करणे तसेच शैक्षणिक सुविधा विकसित करण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आले.

या बैठकीला वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्र- कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button