breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई- पुणे मार्गावरील प्रस्तावित ‘हायपरलूप’ची डिझाईन बघितली का?

मुंबई– पुणे मार्गावरील हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पासाठी हालचाली वेगात सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिका दौऱ्यातील कंपनीतील एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  भेटीबाबत माहिती दिली असून प्रस्तावित ‘हायपरलूप’ची पहिली झलकच या व्हिडिओतून पाहायला मिळते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात ‘व्हर्जिन हायपरलूप’ या कंपनीच्या चाचणी केंद्राला भेट दिली होती. हायपरलूप तंत्रज्ञानामुळे पुणे- मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या २० मिनिटांमध्ये करता येणार असून त्यासाठी संबंधीत कंपन्यांच्या अभियंत्यांचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. या घडामोडी घडत असतानाच मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला.

व्हिडिओत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबद्दल माहिती दिली. ही भेट सकारात्मक झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘हायपरलूप तंत्रज्ञानाबद्दल भारतात उत्सुकता आहे. भारतात विविध मार्गावर हा प्रकल्प कसा राबवता येईल, याबाबत विचार करत आहोत’, असे कंपनीचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख रॅन केली यांनी सांगितले. या व्हिडिओत प्रस्तावित हायपरलूपचे भारतातील डबे कसे असतील, याची झलक दिसते.

पाहा हा व्हिडिओ

हायपरलूपचे फायदे
या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर केवळ २० मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी ७० टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहेत. या १०० टक्के इलेक्ट्रिक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button