breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी पावसाबाबत हाय अलर्ट

मुंबईत आज सकाळी ९ वाजल्यानंतर अचानक हवामानात बदल झाला असून ढग दाटून मुसळधार पाऊस मुंबईत सर्वत्र कोसळत आहे. काल म्हणजे 3 जून पेक्षा आज 4 जूनला पवासाचा वेग जास्त असल्याचं पहायला मिळतय.

मुंबई उपनगरात पावसाला अधिक जोर आहे. पूर्व व पश्चिम उपनगरात सर्व भागांत गेल्या तासाभरापासून पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई भागातही वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळत असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने सकाळी साडेनऊ वाजता पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला असून पुढील तीन तासांत या जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने याआधीच चार दिवस कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button