breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील गृहनिर्माणविषयक परवानग्यांसाठी मनपा आयुक्त आणि सचिवांची समिती

गृहनिर्माण मंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा निर्णय

इज ऑफ डुइंग बिझनेसअंतर्गत प्रकल्पांना समांतरपणे मिळणार विविध मान्यता

मुंबई|महाईन्यूज | प्रतिनिधी

मुंबई शहरामधील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पर्यावरणविषयक, गृहनिर्माणविषयक आणि महापालिकांकडून मिळणाऱ्या विविध परवानग्या जलदगतीने मिळण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त, गृहनिर्माण सचिव आणि पर्यावरण सचिव यांची समिती गठीत करण्याचा निर्णय गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड आणि पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत स्वमालकीच्या घरात राहण्याचे प्रत्येक नागरीकाचे स्वप्न असते. यासाठी लोक मोठी गुंतवणूक करतात. पण अनेकवेळा गृहनिर्माणविषयक मान्यता, पर्यावरणविषयक मान्यता किंवा महापालिकेकडून मिळणाऱ्या मान्यता वेळेत न मिळाल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्प रखडतात. अनेकवेळा एखाद्या विभागाची मान्यता मिळाली तर दुसऱ्या विभागाची मान्यता रखडलेली असते. असे होऊ नये यासाठी तसेच गृहनिर्माण प्रकल्पांना विविध मान्यता समांतरपणे मिळण्याच्या दृष्टीने शासनाच्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’च्या धोरणांतर्गत ही समिती नेमण्यात येत आहे.

परवानग्या मिळण्याची प्रकिया गतिमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. जे गृहनिर्माण प्रकल्प विविध आवश्यक निकषांची पुर्तता करतील त्यांना जलदगतीने मान्यता देण्याच्या दृष्टीने ही समिती काम करेल, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button