breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील अपहरण आणि हत्येतील वॉण्टेड आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक

मुंबईत अपहरण आणि हत्या करुन फरार झालेल्या आरोपीला दिल्लीत आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. इरफान युनूस नमकवाला उर्फ मेमन असं या आरोपीचं नाव आहे. दक्षिण मुंबईतील युसूफ मंझिल इमारतीच्या वयोवृद्ध मालकाचं अपहरण आणि नंतर निर्घृणपणे हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली विमानतळावरुन त्याला अटक केली आहे.

जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपी इरफान परदेशात पळून गेला होता. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दोन वर्षांनंतर दिल्लीत येताच त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीला सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हकीम खंबाटी हे दक्षिण मुंबईतील युसूफ मंझिल इमारतीचे मालक होते. या इमारतीत इरफान आणि त्यांचे कुटुंबीय भाडेकरी म्हणून राहत होते. इमारतीची जागा विकसित करण्यासाठी इरफान प्रयत्नशील होता. मात्र त्यास हकीम यांचा विरोध होता. इरफानने इमारतीत काही बदल केले होते, ज्यामुळे इमारत कोसळून हकीम यांच्या आईचा मृत्यू झाला होता.

इमारत दुर्घटनेनंतर पर्यायी जागा म्हणून धारावीला पाठवण्यात आले होते. फेब्रुवारी 2012 ला हकीम यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले होते. आठ महिने तपास करुनही पोलिसांना आरोपीचा शोध लागला नाही. कुटुंबीयांच्या विनंतीनंतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. तपास हाती येताच गुन्हे शाखेने इरफानला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत इरफान याने आपणच हकीम यांचे अपहरण करुन मुंब्र्यात हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दरम्यान 2016 मध्ये जामीनावर असताना इरफानने परदेशात पळ काढला. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. इरफान दिल्ली विमानतळावर येत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button