breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
माथेरान मिनी ट्रेनचा डबा घसरला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Untitled-2-55.jpg)
पावसाळ्यानंतर माथेरानची मिनी ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आली असतानाच या ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना रविवारी घडली. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अमन लॉज ते माथेरान मार्गावर ही गाडी जात असतानाच त्याची दोन चाके घसरली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही सेवा पूर्ववत होण्यासाठी दीड तास लागला. पावसाळ्यात नेरळ ते माथेरान अशी सेवा बंद ठेवली जाते. १९ ऑक्टोबरपासून मात्र ही सेवा सुरू झाली आणि त्यानंतर रुळावरून डबा घसरण्याची घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मे २०१६ मध्ये मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याच्या दोन घटनांमुळे ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षिततेचे उपाय केल्यानंतर पुन्हा सेवा सुरू करण्यात आली होती.