breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मातोश्रीच्या आवारात शिवसेनेला पराभवाचा धक्का, काँग्रेसचे झिशान सिद्दीकी विजयी

मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला या पराभवाला सामोरे जावं लागलं असल्याचं बोललं जात आहे. वांद्रे पूर्वचे विजयी आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिले होते.

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना 37,636 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांना 23,069 मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या पराभवामागचं मुख्य कारण म्हणजे शिवसेच्या बडखोर तृप्ती सावंत यांना 23,856 मतं मिळाली. तर मनसेच्या अखिल चित्रे यांना 10,403 मतं मिळाली. दरम्यान शिवसेनेचे विद्यमान तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारल्या नंतर या समर्थकांसह मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला होता. तृप्ती सावंत यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात होती. या आंदोलनानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली होती. त्यानंतर काही शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना बेदखल करण्यात आलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button