breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शिरले पाणी, रुग्णांना नाहक त्रास

माणगाव –  माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पावसाचे पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाने रस्त्यावर साचलेले पाणी रुग्णालयात शिरले. रुग्णांच्या बेडखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे रुग्णालयास तळ्याचं स्वरूप आलं आहे.

माणगाव शहरात असलेल उप जिल्हा रुग्णालय सामान्य परिस्थितीच्या रुग्णांचा आधार आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. मात्र आज (दि. 28) झालेल्या पावसाने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाणी शिरले आहे. हे रुग्णालय रुग्णांनी कायम खचाखच भरलेलं असतं. पहिल्याच पावसात रुग्णालयाची ही अवस्था झाल्याने रुग्णांचे तर हाल होताच आहेत, त्याच बरोबर प्रशासन किती गाढ झोपेत आहे हेसुद्ध दिसून आलं आहे. माणगाव ते दिघी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पण कंत्राटदारावर राजकीय वरदहस्त असल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याचबरोबर कोणतीही पावसापूर्वीची काळजी घेण्यात आलेली नसल्याने सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button