breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात विलासराव देशमुखाचे जावई मैदानात

अतुल भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस उतरणार रिंगणात

सातारा |महाईन्यूज|

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काॅंग्रेसने कराड दक्षिणमधून उमेदवारी मिळाली. त्यानंतर आज भाजपनेही आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आणि पृथ्वीराज चव्हाणांविरुद्ध थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांये जावई डॉ. अतुल भोसले उमेदवारी देण्यात आली. त्यामुळेच आता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री विरुद्ध माजी मुख्यमंत्र्यांचे जावई अशी रंगतदार लढत होणार आहे.

डॉ. अतुल भोसले हे विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या कन्येचे पती आहेत. शिवाय डॉ. भोसले हे कराडचे युवा नेते म्हणून ओळखले जातात. ते सध्या भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर “त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो”, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साताऱ्यात केली होती. आज भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button