breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी मंत्री पंकजा मुंडेना शिवसेनेने दिले पक्षप्रवेशाचे आमंत्रण

मुंबई – भाजपचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या व माजी मंत्री पंकजा मुंडे याही भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या अनेक वेळा समोर आल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्यावरही भाजपने अन्याय केलाचा सूर अनेक वेळा उमटला आहे. आता तोच धागा पकडून शिवसेनेने पंकजा मुंडे यांना धनुष्यबाण हाती घेण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

शिवेसेनेचे नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण दिले आहे. सध्या भाजपमध्ये वरिष्ठ आणि मोठ्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याचे काम चालू आहे. पक्षासाठी त्याग केलेल्या आणि योगदान दिलेल्या नेतृत्वाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. पंकजा मुंडेंचे ही तसेच झाले आहे. त्यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहेत. त्यामुळे नाथाभाऊंसारखा निर्णय आता पंकजाताईंनी ही घ्यावा. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नेतृत्वाचा आदर, सन्मान करणारा हा शिवसेना एकमेव पक्ष आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे, अशी प्रतिक्रीया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या नंतर पंकजा मुंडे पक्षांतर करणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला. त्यांचेच बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे सातत्याने बोलले जात आहे. यानंतर त्यांना विधान परिषदेवर भाजप संधी देईल अशी आशा होती. परंतु, अद्याप त्यांना तशी संधी मिळाली नाही. शिवाय पक्ष पातळीवर ही त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर दुर्लक्ष करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पक्षातील जबाबदारी देत त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव हे करण्यात आले. पण, पंकजा मुंडे यावर संतुष्ट असल्याचे दिसत नाहीत. पक्षाकडून पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय होत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button